“नारायण राणेंसह नितेश राणे, चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करा”; रुपाली चाकणकर यांचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सलियनबाबत केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल महिला आयोगाने घेतली आहे. “दिशाच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नसून ती गरोदर सुद्धा नव्हती हे मालवणी पोलिसांनी अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे दिशाच्या मृत्यूबाबत खोटी व बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ. नितेश राणे व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी, असे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

रुपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “दिवंगत दिशा सॅलियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते.तिच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नसून ती गरोदर सुद्धा नव्हती हे मालवणी पोलिसांनी राज्य महिला आयोगाला दिलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. मृत्यूपश्चात देखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे व्यथित झालेल्या दिशा सॅलियनच्या आई वडिलांनी या संदर्भात दिशाच्या मृत्यूबाबत खोटी व बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ.नितेश राणे व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

तसेच दिशाबद्दल समाजमाध्यमावर नमूद असलेली चुकीची व बदनामीकारक माहिती काढून टाकण्यात यावी अशी तक्रार आई वसंती सॅलियन व वडील सतीश सॅलियन यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्यामुळे दिशाच्या मृत्यूबाबत कोणतेही पुरावे नसताना नारायण राणे यांच्यावर मृत्यूपश्चात तिचे चारित्र्यहनन करणे, तिची प्रतिष्ठा मलिन करणे तिची व कुटुंबाची बदनामी केली आहार. तसेच दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय यंत्रणेमार्फत सुरु असल्याची खोटी विधाने केली आहेत.

मुंबई पोलिसांच्या तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखवून दबाव निर्माण करून समाजामध्ये संभ्रम निर्माण केले असल्याने या कृत्याबाबत नारायण राणे यांच्या विरुद्ध तसेच त्यांनी केलेल्या आरोपांना दुजोरा देणारे नितेश राणे व चंद्रकांत पाटील यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करावी. आणि कात्याबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास २४ तासांच्या आत सादर करण्याचेनिर्देश वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना दिले आहेत.

तसेच दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी समाज माध्यमावर तयार करण्यात आलेले लाखो खोटे अकाउंट्स बंद करून तिच्याबद्दल नमूद असलेली खोटी माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावीआणि अर्जदार श्रीमती व श्री. सॅलियन या जेष्ठ नागरिक असलेल्या दाम्पत्याला शांततेने व सुरक्षित जगता यावे याकरिता योग्य ती सुरक्षात्मक उपाययोजना करावी व अर्जदारांच्या मागणीनुसार या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, असे निर्देष चाकणकर यांनी दिले आहेत.

Leave a Comment