हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नुकताच आपला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय क्षेत्रात विविध चर्चाना उधाण आले आहे. सध्या त्यांच्याकडे महिला आयोगाचे अध्यक्षपदही आहे.
4 फेब्रुवारी 2020 रोजी विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पासून हे पद रिक्त होतं. राज्यात गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशावेळी भाजप आणि अन्य विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला जात होता. अशावेळी अखेर ठाकरे सरकारने रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड केली. त्यानंतर त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.
सध्या त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. चाकणकर यांनी आपला अध्यक्षपदाचा अचानकपणे राजीनामा दिला असल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्चा केल्या जात आहेत. चाकणकर यांच्या राजीनाम्या मागचे कारण मात्र, अजूनही गुलदस्त्यात आहे.