हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या बंडावरून आता भाजप नेत्यांसह इतर नेत्यांकडून शिवसेनेवर टीका केली जात आहे. यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेमध्ये असे घडले नसते. एकनाथ शिंदे यांची खदखद ही आताची नसून पूर्वीपासूनच होती. त्याचा स्फोट फक्त आज झाला, असे संभाजीराजेंनी म्हंटले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून 35 पेक्षा जास्त शिवसैनिकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. जर शिवसेनेने मला उमेदवारी दिली असती तर आज शिवसेनेचे अशी अवस्था झाली नसती.
वास्तविक पाहता एकनाथ शिंदे यांची खदखद ही आताची नसून पूर्वीपासूनच होती. त्याचा स्फोट फक्त आज झाला आहे. जे चाललंय ते मी बघत आहे. काय निर्णय येतो ते आता बघू. सरकार कुणाचेही असावे पण ते चांगलं चालावं आमचं एवढंच मत असल्याचे संभाजीराजे यांनी म्हंटले आहे.