हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक याना 8 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. मलिक याना ईडी कोठडी सुनावण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपला इशारा दिला.
महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या . एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू. कंस आणि रावण सुध्दा मारले गेले…हेच हिंदुत्व आहे…. जय महाराष्ट्र! असे संजय राऊत यांनी म्हंटल.
महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या . एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू.
कंस आणि रावण सुध्दा मारले गेले…हेच हिंदुत्व आहे..
जय महाराष्ट्र!— Sanjay Raut (@rautsanjay61) February 23, 2022
दरम्यान, नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आल्यानंतर भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायचा नाही अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे. महाविकास आघाडी कडून भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणे विरोधात आजपासून राज्यभर आंदोलनही पुकारण्यात आले आहे.