सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
जावळी तालुक्यातील सोनगाव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुक जाहीर झाल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कारखान्याच्या निवडणुकीस आता आरपीआय कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. आज रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी उपनिबंधक जावळी यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले. तसेच कारखान्याची निवडणूक रद्द न केल्यास सहकार मंत्र्यांना घेराव घालू, असा इशाराही दिला.
प्रतापगड सहकारी साखर खरखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीवर आता रिपाईच्या वतीने आक्षेप घेण्यात आलेला आहे. दरम्यान आज रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी जावळी येथील उपनिबंधकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवेदन देत “निवडणूक रद्द करावी अशी मागणी केली. त्यानंतर त्यांनी निवडणूक रद्दबाबत निर्णय न घेतल्यास सहकार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना घेराव घालणार आहोत. प्रतापगड कारखान्याचा जावली दुध संघ होऊ देणार नाही,” असा इशारा दिला.
यावेळी उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांना निवेदनही दिले तसेच याबाबात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली. यावेळी रिपाइंचे सातारा जिल्हाध्यक्ष मा.संजय गाडे, वंचित आघाडी जिल्हाध्यक्ष कृष्णात मोरे, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, बौध्दाचार्य चंद्रकांत सोनावणे उपस्थित होते.