नवी दिल्ली : संजय राऊत यांना आज ED ने दणका दिला. राऊत यांची संपत्ती जप्त करत ED ने राऊत यांच्यावर मोठी कारवाई केली. यानंतर आज संध्याकाळी संजय राऊत दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी हजर असल्याचे पहायला मिळाले. विशेष म्हणजे यावेळी भाजप नेते नितिन गडकरी हे सुद्धा उपस्थित असल्याने अनेकांच्या माना उंचावल्या.
Union Minister Nitin Gadkari, Shiv Sena leader Sanjay Raut & Maharashtra MLAs (of any party) reach NCP leader Sharad Pawar's residence for dinner. pic.twitter.com/bA54cQUTcf
— ANI (@ANI) April 5, 2022
शरद पवारांच्या एका बाजूला राऊत अन् दुसर्या बाजूला गडकरी यांना पाहुन नक्की मॅटर काय असा प्रश्न पडला आहे. तर त्याचे झाले असे की शरद पवार यांनी महाराष्ट्रातील आमदारांकरता दिल्ली येथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी महाराष्ट्रातील खासदारांनाही निमंत्रीत करण्यात आले होते. यामध्ये श्रीनिवास पाटील, नितिन गडकरी, संजय राऊत हे सुद्धा होते. गप्पांचा कार्यक्रम रंगला असताना शरद पवारांच्या खुर्चीच्या एका बाजूला राऊत तर दुसर्या बाजूला नितिन गडकरी बसलेले एका फोटोत दिसले.
संजय राऊत यांच्या अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटवर ईडीने कारवाई केल्याची माहिती आहे. 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. असत्यमेव जयते एवढंच ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. सकाळी झालेल्या कारवाईनंतर राऊत संध्याकाळी दिल्ली येथे शरद पवारांच्या स्नेहभोजनाला हरज राहिल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे.