हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल अडीच महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावत वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कवरील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमालाही उपस्थिती लावली. यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री आजारी असतानाच्या काळात विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. विरोधक मुख्यमंत्र्यांवर भावनाशून्यपणे टीका करत होते. विरोधकांच्या या नामर्दपणाला महाराष्ट्रातील जनतेनेच सडेतोड उत्तर दिले आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी भाजपवर केला.
संजय राईट यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री आजारी असताना विरोधकांकडून मात्र मुख्यमंत्र्यांवर टीका करून मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवर तोंडसुख घेतले जात होते. मुख्यमंत्री आज समोर आले.आता ते सर्व कामात सक्रिय होणार आहेत. राज्यातील विरोधी पक्ष भावनाशून्य होऊन मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर टीका करत होता. हे कोणत्याही प्रकारच्या राजकीय नितीमत्तेला धरून नव्हतं. माणुसकीला धरून नव्हते.
या नामर्दपणाला आज महाराष्ट्रातील जनतेने उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एक दोन दिवसांपासून सक्रिय झाले. सकाळी वर्षावर ध्वज फडकवला. ते शिवतीर्थावर आले. दोन दिवसांपासून बैठका घेत आहेत. ज्यांनी मुख्यमंत्र्यांवर नामर्दपणाच्या कॉमेंटस केल्या त्यांना चपराक बसलीच आहे, असे राऊत यांनी म्हंटले.