पाच राज्यांच्या निवडणुक निकालाबाबत संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशसह चार राज्याच्या निवडणुकीच्या निकालासाठी आज प्रत्यक्ष मत मोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आताच सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश आणि गोव्यात आदित्य ठाकरे यांनीही प्रचार सभा घेतल्या आहेत. आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्राबाहेर देशात उतरलो आहोत. आम्ही थांबणार नाही. यानंतर आता लोकसभेच्याही निवडणुका लढणार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी राऊत यांनी दिली.

आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्याच्या मतमोजणीवरून आपली भूमिका मांडली. यावेळी राऊत म्हणाले की, आताच कुठे मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अजून दोन तासात कळेल कि मतदारांचा कल कळेल. उत्तर प्रदेशातील निकालाबाबत सांगायचे झाले तर त्याचे निकाल पाच वाजेपर्यंत येतील. अखिलेश यादव यांनी चागली टक्कर दिली आहे.

दुपारी दोननंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. उत्तर प्रदेशात पाहिले तर मतांचे आकडे हे कमी जास्त होतच राहतील. मला विश्वास आहे कि अखिलेश यादव मोठी टक्कर देत आहेत, असे राऊत यांनी म्हंटले.