शरद पवारांसह महाविकास आघाडीचे नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर; राऊतांच्या दाव्याने खळबळ

0
37
Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणे वरून भाजप वर निशाण साधला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात टार्गेट दिलं जातंय, महाराष्ट्रात शरद पवारांसह महाविकास आघाडीतील नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर आहेत असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमाशी संवाद साधताना भाजपवर टीका केली आहे. तपास यंत्रणांना महाराष्ट्रात टार्गेट दिलं आहे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह महाविकास आघाडीतील नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर आहेत असे राऊत यांनी म्हंटल. सोबतच शरद पवारांबाबत निलेश राणेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुनही राऊतांनी समाचार घेतला आहे. भाजपची नवी नेतेमंडळी पवार साहेबाना टार्गेट करत आहेत आणि आम्ही त्यांची बाजू घेतली कि आम्हाला पवारांचे चमचे म्हणता , हो आहे आम्ही चमचे असे म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही एका पक्षाचे पंतप्रधान नसून ते अवघ्या देशाचे पंतप्रधान आहे. मोदी हे एका पक्षाचे नेतृत्व करतायेत. ते देशाचे पंतप्रधान आहे, भाजपचे नाही. पण भाजपाने त्यांना खुजं करुन टाकलं आहे. ते फक्त आमचेच पंतप्रधान आहेत, आमच्याच पक्षाचे आहेत, पक्षातल्या एका गटाचे आहेत असं वातावरण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी निर्माण केलं असून करतही आहेत असे संजय राऊत यांनी म्हंटल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here