शिवसेना नेते संजय राऊत खंबाटकी बोगद्याजवळ दीड तास अडकले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पुणे- बंगळुरु महामार्गावरील वेळे येथे सातारा ते पुणे जाणाऱ्या मार्गावरुन वाहतूक कोंडीत शिवसेनेचे नेते संजय राऊत हे दीड तास अडकले होते. यावेळी वाहतूकीची कोंडी पाहून संजय राऊत गाडीतून खाली उतरून 200 मीटर पायी चालत हॉटेल गाठलं. तिथेच जेवण करुन वाहतूक कोंडी कमी होण्याची वाट पाहिली. परंतु तोपर्यंत सेलिब्रिटी प्रमाणे संजय राऊत यांच्यासोबत फोटो व सेल्फी घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचा नेता म्हणून शिवसेनेचे संजय राऊत यांच्याकडे पाहिलं जातं. सध्या अनेक विषयांमुळे चर्चेत असलेल्या संजय राऊत यांची रविवारी (29 मे) कोल्हापूरची सभा संपली आणि ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील वेळे गावच्या हद्दीत पोहोचले. तेव्हा पुढे ट्रॅफिक जाम असल्याने अचानक आराम हाॅटेलवर दाखल झाले, अन् सेलिब्रिटी प्रमाणे संजय राऊत यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी झाली. तेवढ्यात काही शिवसैनिकांनीही भगवी शाल देवून सत्कार केला.

खंबाटकी घाटातील ट्रॅफिक जाम, संजय राऊतांचे चालत जाणे अन् अनेकांनी सेल्फीसह शिवसैनिकांनी केलेल्या सत्कार असा काहीसा अचानक अनुभव मिळाला. यामुळे निघताना संजय राऊत यांना झालेला वाहतूक कोंडीचा त्रास कमी झाला. त्याचबरोबर सामान्यांची प्रवाशांच्यात काय हालत होत असले यांचाही अनुभव घेता आला.

Leave a Comment