व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुघल वृत्तीच्या शरद पवारांनी आजपर्यंत महाराष्ट्राला लुटले; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “जो समाज आपला इतिहास विसरतो तो समजा आपला इतिहास निर्माण करत नाही. आता शरद पवार आणि त्यांचा नातू रोहित पवार यांनी चौंडीत काहीतरी गोंधळ व्हावा, दंगली व्हाव्या, असे षडयंत्र रचले आहे. मुघल वृत्तीच्या शरद पवारांनी आजपर्यंत महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे, असे म्हणत पडळकर यांनी घणाघाती टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी बारामतीत एका कार्यक्रमास उपस्थिती उपस्थिती लावली. यावेळी ते म्हणाले की, अहिल्यादेवी यांच्या जयंतीसाठी जो पैसा वापरला जात आहे. जे मलिक दाऊदच्या मांडीला मांडी लावून बसले आणि दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला. त्याच व्यवहारातील तोच पैसा आहिल्यादेवींच्या जयंतीला वापरत आहेत. त्यामुळे आम्ही चौडींच्या ठिकाणी जर वाकडी नजर टाकत असाला तर आम्ही ते सहन करणार नाही, असा इशाराही पडळकर यांनी दिला आहे.

पुण्यातील घडलेल्या प्रकारावरून साधला निशाणा

पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर पुण्यातील श्रीमंत दगडूशेट गणपती मंदिरात घडलेल्या प्रकारावरून निशाणा साधला आहे. एकीकडे आहिल्यादेवींच्या नावाने प्रेम दाखवतात आणि तिकडे ते मटन खाऊन गणपतीला जातात, अशी घणाघाती टीका पडळकर यांनी केली आहे. येणाऱ्या काळात मी माझी ताकद पवारांना दाखवणार आहे. आता घोडा मैदान दूर नाही, असे थेट आव्हानच पडळकर यांनी पवारांना दिले आहे.