राज्यात मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही; संजय राऊतांची घणाघाती टीका

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीसांचे सरकार आले आहे. या सरकारवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत या सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये गेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या मागचे खरे कारण हे सरकार बेकायदेशीरच आहे,”असे टीका करताना राऊत यांनी म्हंटले आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, “अजूनही राज्यात मंत्रीमंडळ अस्तित्वात आलेले नाही. फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांचा शपथविधी होऊन 12 दिवस होऊन गेले आहेत. पण अजूनही सरकार स्थापन झालेले नाही. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी होणार आहे. तिथे गेलेले अनेक आमदार अपात्र ठरू शकतात,” असे राऊत यांनी म्हंटले.

महाराष्ट्रात लॉकडाऊन राज्यपाल कुठे आहेत?

यावेळी संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिह कोशारी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, “अपात्रतेची तलवार डोक्यावर असणाऱ्यांना मंत्रीपदाची शपथ देणे हा राजद्रोह आहे. आता राज्यपाल कुठे आहेत आमचे? सरकार अस्तित्वात नाही, मंत्रीमंडळ अस्तित्वात नाही. महाराष्ट्र वाऱ्यावर आहे, महापूर आहे. कॉलऱ्याचे थैमान आहे. कालपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करणारे राज्यपाल कुठे आहेत? आता तुमच्या मार्गदर्शनाची राज्याला गरज आहे”, असे राऊत यांनी म्हंटले.