भोंग्यांबाबत आम्हाला कुणी अक्कल शिकवू नये; संजय राऊतांचा टोला

sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा हा सर्व प्रथम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या मुद्यांबरोबर त्यांनी राष्ट्रवादी आणि राज्य सरकारवरही टीका केली. भोंग्याच्या मुद्यांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे व भाजप, केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या भोंग्यांबाबत भाजपला भूमिका घ्यायचीच असेल तर अगोदर मोदींनी भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरणच ठरवावे. तसेच आम्हाला भोंग्यांबाबत कुणीही अक्कल शिकवू नयेत, असा टोला राऊत यांनी राज ठाकरे व भाजपला लगावला आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत भोंग्याच्या मुद्यांवरून भाजप व राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी राऊत म्हणाले की, राज्यात सध्या हिंदुत्वाच्या नावावर भोंगे वाजऊन ढोल वाजवण्याचे प्रकार केले जात आहेत. त्यांच्या अशा प्रकारच्या कृत्यामुळे लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण होत आहेत. मात्र, हे फारकाळ चालणार नाही. वास्तविक केंद्र सरकारनेच भोंग्यां संदर्भात एक असे धोरण तयार करणे आवश्यक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी आवाहन करतो कि त्यांनी भोंग्यांबाबत एक धोरण राबवावे आणि त्याची सर्वप्रथम अंमलबजावणी हि बिहार राज्यात करावी. त्यानंतर गुजराण व महाराष्टात हे धोरण राबवावे. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मी सांगितलेल्या तीन राज्यात भोंग्यांबाबतचे धोरण तयार करून ते राबवावे. तसेच सक्तीने त्या धोरणाची अंलबजावणीही करावी, असे आव्हान यावेळी राऊत यांनी मोदी यांना केले.