युपीए सोडा, एनडीए तरी कुठे अस्तित्वात आहे?? संजय राऊतांचा सवाल

0
51
Raut Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावर असताना युपीए वगेरे काही नाही अस विधान केले होते. ममता बॅनर्जी यांच्या विधानावरून अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी आपली रोखठोक मत मांडले.

जसं युपीए अस्तित्वात नाही म्हणतात तसंच एनडीएही अस्तित्वात नाही. एनडीए कुठे आहे, असा रोखठोक सवाल संजय राऊत यांनी केला. शिवसेना, अकाली दल बाहेर पडले असून इतर पक्षही बाहेर पडत आहेत. एकेकाळी आम्ही एनडीएत होतो. युपीए मजबूत करण्याची गरज आहे हे सत्य असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी? 

भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असून यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार असल्याचं ममता बॅनर्जींनी संकेत दिले आहेत. ममता बँनर्जी म्हणाल्या होत्या की, “काय आहे यूपीए? यूपीए आता उरली नाही. जो फिल्डमध्ये राहून, तळागाळात उतरुन लढू शकतो तो स्ट्राँग विरोधक. जो लढतच नाही त्याला आम्ही काय म्हणणार? अस म्हणत त्यांनी काँग्रेस वर निशाणा साधला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here