हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शिवसेना आणि काँग्रेसची जवळीक वाढलेली आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर शिवसेना युपीए मध्ये सहभागी होणार का असा सवाल संजय राऊत यांना विचारला असता त्यांनी मात्र याबाबत सावध प्रतिक्रिया दिली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यूपीए संदर्भात निर्णय घेतील असे संजय राऊत यांनी म्हंटल.
संजय राऊत म्हणाले, शिवसेना यूपीएत जाणार या चर्चा मीडियामध्ये आहेत. आमच्यात या चर्चा झाल्या नाहीत. आम्ही ते न्यूजपेपर आणि माध्यमातून पाहतो. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यूपीए संदर्भात निर्णय घेतील. यूपीएनं समर्थपणानं एकत्र येऊन विरोधकांनी ताकद निर्माण केली पाहिजे, असं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं मत आहे असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात मिनी यूपीएचा प्रयोग सुरु आहे. आम्ही महाराष्ट्रात काँग्रेससोबत एकत्र आहोत. संसदेत पण आम्ही काँग्रेस सोबत आहोत. असे संजय राऊत यांनी म्हंटल.दरम्यान, यावेळी त्यांनी 5 राज्यातील निवडणूकाविषयी देखील भाष्य केले. शिवसेना गोव्यात निवडणूक लढवणार आहे. तसेच उत्तर प्रदेशात निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी सुरु आहे, असं संजय राऊत म्हणाले. गोव्यात मात्र आम्ही गोव्यात टीएमसीसोबत शिवसेना जाणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.