आरोपीला भरचौकात फासावर लटकवा; श्रद्धा हत्या प्रकरणी राऊत संतापले

sanjay raut shraddha murder case
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. आफताब नावाच्या तिच्या प्रियकराने तिचा खून करून शरीराचे तब्बल ३५ तुकडे केल्याच्या धक्कादायक घटनेने देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता अशा आरोपींचा भरचौकात फासावर लटकवा अशी मागणी त्यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

समाजात विकृती असते, पण हे विकृतीच्या सुद्धा पुढचं पाऊल आहे. खरं तर अशा प्रकरणात कोणी राजकारण करत असेल तर ते बंद केलं पाहिजे. जे आरोपी आहेत त्यांच्यावर खटलेही चालवू नये, आता जो परिस्थितीजन्य पुरावा दिसतोय त्याच्या आधारे अशा हत्यारांना भरचौकात फाशीवर लट्कवल पाहिजे असा शब्दात संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. तसेच आपल्या मुलींनीही खूप सावधपणे जगण्यास शिकलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.

दरम्यान, श्रद्धा हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आफताबने वेब सीरिज पाहून श्रद्धाच्या हत्येची प्लॅनिंग केलं. श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर त्याने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. श्रद्धाच्या मृतदेहाला ठेवण्यासाठी त्याने नवीन फ्रीजसुद्धा खरेदी केला होता. धक्कादायक म्हणजे, श्रद्धाचे तुकडे फ्रिजमध्ये असताना आफताब दुसऱ्याच कोणत्या मुलीसोबतही प्रेमाचे चाळे करत होता. ही दुसरी मुलगी जून-जुलैमध्ये अनेकदा आफताबच्या भाड्याच्या घरात आली होती. एवढ्यावरच न थांबता आफताब तिसऱ्या मुलीलाही आपल्या जाळ्यात अडकवण्याच्या प्रयत्नात होता, अशी माहिती समोर आलीय. त्यामुळे त्याने आपल्या जाळ्यात आणखी किती मुलींना अडकवलंय? याचाही तपास पोलीस करणार आहेत.