हृदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीतुन काढलं हे खोटं; राऊतांनी खोडून काढला मोदींचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जोरदार भाषण करत काँग्रेस वर टीका केली होती. दिवंगत लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं, अस म्हणत त्यांनी काँग्रेस वर आरोप केला. मोदींचा हा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोडून टाकला. घटनात्मक पदावरील व्यक्तीने तरी खोटं बोलू नये असेही राऊत म्हणाले.

मला कळायला लागल्यापासून मी सागरा प्राण तळमळला’ गाणं आकाशवाणीवरुनच ऐकलं आहे. हे गाणं लोकप्रिय कऱण्याचं काम आकाशवाणीनेच केलं. यावरून हृदयनाथ मंगेशकर यांना काढलं असेल, तर ते गाणं वाजवतील कशाला, असा सवाल करत रेकॉर्डमध्ये असं काही नाही, असा दावा राऊत यांनी केलाय.आजही मी आकाशवाणी, दूरदर्शन, टीव्हीवर ऐकतो. हे गाणं आमच्या ह्रदयात आहे. मंगेशकर भगिनी तसंच ह्रदयनाथ मंगेशकरांनी हे गाणं फार वरती नेऊन ठेवलं आहे. असे राऊत म्हणाले.

मोदी नेमकं काय म्हणाले-
काँग्रेस ने मंगेशकर कुटुंबियांवर अन्याय केला असा आरोप मोदींनी केला. लता मंगेशकर यांचे छोटे भाऊ पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडियो रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. हृदयनाथ मंगेशकर यांनी वीर सावकरांची देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. हृदयनाथ मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं,” असं नरेंद्र मोदी म्हणाले होते.