दिल्ली | शिवसेना नेते संजय राऊत लिलावती रुग्नालयात दाखल झाले आहेत. राऊत यांनी आज दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राऊत रुग्नालयात दाखल झाले आहेत.
संजय राऊत मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील सत्तासमिकरणांबाबत देशभर चर्चा सुरु आहे. यामध्ये राऊत शिवसेनची बाजू मांडताना दिसत आहेत. दरम्यान दैनंदिन कामकाजात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने राऊत यांच्या छातीत दुखत होते.
राऊत यांची सदर रुग्नालय भेट पूर्वनियोजित होती अशी माहिती मिळत आहे. राऊत यांची तपासणी झाल्यानंतर ते त्यांच्या पुढील दौर्यासाठी रवाना होणार आहेत.