भाजपने काय लायकीचे लोकं घेतले ते कळतंय; राऊतांची चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे मेंदू आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, तेव्हा देशात कोणतंही राज्य नव्हतं. त्यांना कळतं का? भाजपमध्ये बाहेरून काय लायकीचे आणि बुद्धीचे लोकं घेतली हे या लोकांच्या विधानावरून कळतंय असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मठीकाणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. “रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील, याचं दर्शन आज महाराष्ट्राला झालं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही, मध्य प्रदेशमधील महू येथे झाला आहे. इतकं सामान्य ज्ञान असू नये? अशी टीका चित्रा वाघ यांनी केली होती, त्याबाबत विचारलं असता संजय राऊतांनी तिखट शब्दात जोरदार प्रत्युत्तर दिले.

बाबासाहेबांचा जन्म 1891मध्ये महू येथे झाला होता. महू सध्या मध्यप्रदेशात आहे. तेव्हा मध्य प्रदेश नव्हतं. फक्त एकच मुंबई प्रांत होता. भाषिक राज्य कधी निर्माण झाली, याचा अभ्यास करावा. महाराष्ट्र कधी निर्माण झाला? मध्यप्रदेश कधी निर्माण झाला? बिहार कधी निर्माण झालं? त्यांना कळतं का? असा संतप्त सावरलं संजय राऊतांनी केला. आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत हे जर त्यांना माहीत नसेल, कळत नसेल तर अजूनही त्यांच्या आंबेडकरांविषयी काय भावना आहेत, हे स्पष्ट होतंय. भाजपमध्ये बाहेरून काय लायकीचे आणि बुद्धीचे लोकं घेतली हे या लोकांच्या विधानावरून कळतंय असा टोलाही त्यांनी लगावला.