देशभावनेशी खेळणाऱ्या सोमय्यांची वकिली फडणवीसांनी करू नये; राऊतांची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यां यांच्यावर विक्रांत या युद्धनौकेसाठी जमा केलेले पैसे लाटल्याचा आरोप केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सोमय्यांची बाजू घेत राऊतांवरच निशाणा साधल्या नंतर संजय राऊत यांनी फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे.आएनएस विक्रांतच्या नावाखाली जमा केलेल्या पैशांमध्ये भ्रष्टाचार करून देशभावनेशी खेळणाऱ्या किरीट सोमय्या यांची वकिली देवेंद्र फडणवीस यांनी करू नये असा टोला त्यांनी लगावला.

भाजपाचे महात्मा किरीट सोमय्या आणि त्यांचे महापुत्र नील सोमय्या यांच्या राष्ट्रद्रोही भ्रष्टाचाराचं प्रकरण मी बाहेर काढलं. इतकं होऊनही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आश्चर्य वाटतं. राष्ट्रभक्तीवर गाणी गातात, भाषणं देतात. दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती, हिंदुत्व शिकवतात.. पण काल ज्या पद्धतीने राष्ट्रद्रोही, देशद्रोही व्यक्तीची वकिली करण्याचा प्रयत्न केला ते पाहून स्वर्गात गोळवळकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, हेगडेवार आणि आजचे मोहन भागवत यांचा जीव तीळतीळ तुटला असेल अशी टीका संजय राऊतांनी केली.

तुमचं या देशासाठी काय योगदान आहे. तुम्ही काय उपटलं?? उलट ज्यांचं बलिदान आहे त्या बलिदानाचा लिलाव करुन पैसे गोळा करत आहात. कधी राम मंदिराच्या नावे, कधी गंगाजल विकून पैसे गोळा केलेत. महाराष्ट्रात आयएनएस विक्रांत आमचा स्वाभिमान असून त्यातून पैसे गोळा केला. आणि त्या भयंकर अशा भ्रष्ट गुन्हेगाराची बाजून घेऊन त्याची वकिली करता, अस म्हणत संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली