Wednesday, June 7, 2023

शिंदे गट म्हणजे कोंबड्यांचा खुराडा, त्या कधीही कापल्या जातील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर तोफ डागली आहे. मी शिंदे गटाकडे पक्ष म्हणून पाहत नाही. भाजपने पाळलेलं ते कोंबड्याचं खुराडं आहे. या खुराड्यातील कोंबड्या कधीही कापल्या जातील अशी जहरी टीका संजय राऊतांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, तुम्ही जे शिंदे – मिंधे गट म्हणताय, त्यांना मी पक्ष मानत नाही. भाजपने पाळलेलं ते कोंबड्याचं खुराडं आहे. कोंबड्या जस सकाळ सांध्याकाळ कॉक कॉक करत असतात तसे ते करतायत, त्यांच्याकडे काय विचार आहेत ? काय बैठक आहे? त्यामुळे त्यांना काय पक्ष म्हणायचं का? भाजप कधीही त्यांच्या मानेवर सूरी फिरवू शकत असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

मिंधे टोळीने 22 काय 48 जागा लढवाव्यात आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी लोकसभेच्या सर्व जागा लढव्या, 22 जागा सोडाच भाजप त्यांना 5 जागा दिल्या तरी भरपूर झालं. आमचा 19 खासदारांचा आकडा कायम राहील असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.