हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील राजकीय वातावरण सध्या एका गोष्टीमुळे चांगलेच तापले आहे. ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून . यावरून आज शिवसेना खासदार संजय राईट यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मला तर राज्यात भीती वाटते कि एखाद्या शिवसैनिकांनी जर वडापावचा गाडा टाकला तर त्याच्यावर सुद्धा ईडीकडून कारवाई केली जाईल.
संजय राऊत यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, “केंद्रीय तपास यंत्रणा सूडाच्या भावनेने तपास करत आहेत. त्या पद्धतीने महाराष्ट्राचं गृहमंत्रालय कधीच करणार नाही. विरोध पक्षनेते कितीही बोंबलले की सूडाच्या कारवाया सुरू आहेत तरी राज्याच्या गृहमंत्रालयाला एक परंपरा आहे. ते त्यानुसारच काम करेल. जर आम्हाला सुडाच्या कारवाया करायच्या असतील, तर आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल”.
सध्या केंद्रीय तपास यंत्रणेंकडून अनेक ठिकाणी कारवाई केली जात आहे. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये राज्यपाल दोन्ही सरकारांवर निशाणा साधतात. इतरही राज्यांमध्ये राज्यपाल आहेत. ईडीची कार्यालये आहेत. पण ईडी आणि राज्यपाल जिथे भाजपाचं सरकार नाही, तिथेच कारवाया करतात. भीतीही वाटते कि एखाद्या शिवसैनिकांनी जर वडापावचा गाडा टाकला तर त्यांच्यावरही हे ईडीचे लोक कारवाई करतील, असे राऊत यांनी म्हंटले.