राज्यातील कारभार सुरळीत, चंद्रकांत पाटलांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल; राऊतांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधानांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिल्याने त्यांच्यावर टीका केली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटलांवर निशाणा साधला. “देशात कोणतं राज्य नीट असेल तर ते महाराष्ट्र आहे. चंद्रकांत पाटील किंवा भाजपाच्या अनेक नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल. नेत्रतज्ञ डॉक्टर लहानेंचं एखादं पथक भाजपाच्या कार्यालयात पाठवता येईल का हे पाहतो. त्यांना श्रवणयंत्रपण देणार आहे. महाराष्ट्रातील राज्य उत्तम प्रकारे सुरु आहे, असा टोला राऊतांनी लगावला.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले होते. मुख्यमंत्री नाही हजर राहिले, कधी काळी पंतप्रधानही एखाद्या बैठकीला हजर राहणार नाहीत.

काल चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल एक वक्तव्य केले. त्यांना एवढंच सांगतो की, भाजपाच्या आय़ुष्यात टीका करण्याशिवाय दुसरं काय आहे. खरं तर भाजपाने चीनने केलेल्या घुसखोरीवर बोललं पाहिजे. तिथे सीमेवर फार गंभीर स्थिती आहे. चंद्रकांत पाटील किंवा भाजपाच्या अनेक नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल.

Leave a Comment