महाराष्ट्रात वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू – संजय राऊत

sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक हजार चौरस फुटाहून अधिक असणाऱ्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. काल देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रात वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू असल्याचे त्यांनी म्हंटले.

संजय राऊत यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल राज्य सरकारने एक निर्णय घेतला. तो म्हणजे किराणा दुकान आणि सुपरमार्केट्मधे वाईन विक्रीसाठी ठेवण्याचा. वाईन मद्याचा दर्जा आहे का माहीत नाही. जरी असेल तरी देशात दारु बंदी आहे का? पण महाराष्ट्रात जे वाईन विक्रीला विरोध करत आहेत ते शेतकऱ्यांचे शत्रू.

वाईन विरीतून शेतकऱ्यांना आर्थिक लालभ होणार आहे. महाराष्ट्रात वाईन तयार केली जाते. त्याची वाईन खरेदी करून त्याची किराणा दुकानातून विक्री केली जाणार आहे. मात्र, काहीजण याला विरोध करीत आहेत. राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आलेला निर्णय योग्य आहे.