संजय राऊतांचं आजही एक हटके ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । दररोज सूचक ट्विट करण्याऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एक ट्विट केलं आहे. बाळासाहेबांची पुण्यतिथी झाल्यानंतर आज सकाळी हे ट्विट केले आहे. दररोज काही ना काही हटके ट्विट करणाऱ्या राऊत यांनी आजही ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी आजच ट्विट थेट दिल्लीतून केलं आहे.

आज सोमवारी संजय राऊत यांनी कवी हबीब जालिब यांच्या कवितेतील चार ओळी ट्विट केल्या आहेत. ‘तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था – हबीब जालिब’ असे ट्विट करत संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपला टोला लगावला आहे. भाजपला बहुमतात येऊन सत्तास्थापनेचा विश्वास होता, मात्र त्यांना १०५ जागा मिळाल्याने व शिवसेनेने त्यांची कोंडी केल्याने सत्ता स्थापन करू शकले नाहीत. त्यामुळे मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांनाच हा टोला असेल की काय, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यासाठी संजय राऊत दिल्लीला गेले आहेत. सत्तास्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नसताना फक्त चर्चा सुरू आहे. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना मिळून सत्ता स्थापन करतील अशीही चर्चा सुरू आहे. आज शरद पवार दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतील, त्यानंतर सत्तासमीकरणे काय असतील याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.