… तरीही शिवसेना सोडणार नाही, मरेन पण शरण जाणार नाही; राऊतांचे ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडी त्यांची चौकशी करण्याची शक्यता असून राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

… तरीही शिवसेना सोडणार नाही..असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे तसेच शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण त्यांनी शेअर केला आहे. खोटी कारवाई.. खोटे पुरावे .. मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही.. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील…. जय महाराष्ट्र!! असं संजय राऊत यांनी म्हंटल.

कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन असेही राऊतांनी म्हंटल

दरम्यान, पत्राचाळ प्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीचे सुमारे १० अधिकारी संजय राऊतांच्या घरी गेलेलं आहेत. या आधीही पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊतांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. मागील आठवड्यात २ वेळा ईडीने त्यांना समन्स बजावले होते. मात्र संसदेचं अधिवेशन सुरु असल्याचे कारण देत संजय राऊतांनी चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. मात्र आज अचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. राऊतांच्या अटकेची देखील शक्यता आहे.