हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम बंगाल निवडणूकीची सर्वत्र चर्चा असून शिवसेना या निवडणुकीत भाग घेणार का अशी चर्चा जोर धरत होती. गतवर्षी शिवसेनाने बिहार विधानसभा निवडणुकीत उडी मारली होती. त्यामुळे आता पश्चिम बंगाल मधेही शिवसेना उमेदवार उभे करणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली आहे.
सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभं राहण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण आहेत,’ असं राऊत यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 4, 2021
दरम्यान पश्चिम बंगाल मध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असून 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी अशी जोरदार लढत पश्चिम बंगाल मध्ये पाहायला मिळत आहे. काहीही करून पश्चिम बंगाल मध्ये सत्ता स्थापन करायचीच असा निर्धार भाजपने केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’