हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयएनएस विक्रांत प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप माझी खासदार किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान राऊत यांनी आज सकाळी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले असून त्यामध्ये किरीट सोमय्या मुलगा नील सोमय्यासह फरार झाले आहेत तसेच ते मेहुल चोक्सीसारखे पळून तर गेले नाहीत ना? असे म्हंटले आहे. राऊतांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांनी आज किरीट सोमय्या यांयाच्यावर निशाणा साधला असून त्यांनी आज त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून महत्वाचे ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, किरीट सोमय्या मुलासह फरारी झाला आहे. न्याय यंत्रणेवर दबाव आणुन सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्र तयार केली तरी सत्याचाच विजय होईल. प्रश्न इतकाच की. हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहित ? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
किरीट सोमैया बेटे के साथ फरार है। न्यायपालिका पर दबाव बनाकर, ये ठग छूटने की कोशिश में हैं। अदालत को गुमराह करने के लिए भले ही जाली दस्तावेज बना लें, तब भी सच्चाई की जीत होगी। फिलहाल प्रश्न यही है कि ये दो ठग कहाँ हैं? कहीं मेहुल चोकसी की तरह भाग तो नहीं गए?@BJP4Maharashtra pic.twitter.com/AAZjydsZFM
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 11, 2022
मेहुल चोक्सी आणि सोमय्यांचे जुने नाते आहे. त्यांना अटकपूर्व जामीन मिळत नाही तोपर्यंत त्यांना लपवून ठेवण्यात आले आहे. राजभवनाने काही चुकीचे काम केले तर त्यांची वाचलेली इज्जत देखील जाईल. मुंबई पोलिस या ठगांना शोधून काढतील. त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी राऊत यांनी केली आहे.