हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुकीपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या स्वराज्य या संघटनेची घोषणा करत निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता शिवसेना अप्रवक्ते संजय राऊत यांनीही आज ट्विट करत “कोणी कितीही आकडे मोड करावी. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे और जितेंगे भी हम,” असे सूचक विधान ट्विटच्या माध्यमातून केले आहे.
संजय राऊत यांनी आज ट्विट करत निवडणुकीबाबत एक महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय. भ्रष्टाचारातून पैसा त्यातून घोडेबाजार ! हे दुष्ट चक्र कधी थांबेल? एक मात्र ठरली कि सहावी जागा शिवसेना लढवणार आहे. कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे और जितेंगे भी, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी
महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार!हे दुष्ट चक्र कधी थांबेल?
सहावी जागा शिवसेना लढेल.
कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे . जितेंगे. pic.twitter.com/VOXRKRDzdk— Sanjay Raut (@rautsanjay61) May 18, 2022
संजय राऊत यांनी आज ट्विट केले असून तत्पूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी सहाव्या जागेवर स्वत:चा उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी पाठिंबा हवा असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी अट शिवसेनेने घातल्याची माहिती मिळत आहे.