मुंबई | सध्या बँकांच्या फसवणुकीचे प्रकार खूप वाढत आहेत. त्यामुळे बँका आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी ग्राहकांना मार्गदर्शनपर नियमावली समजून सांगत असते. सध्या ऑनलाइन आणि मोबाईलवरून फसवणूक खूप वाढत आहे. याबाबत ग्राहकांनी सावध राहायला पाहिजे. असे एसबीआयने एका निवेदनात सांगितले आहे. एका छोट्याशा चुकीमुळे आपले बँक खाते रिकामे होऊ शकते. सावध न राहिल्यास आपले खाते हॅकर्स लुटू शकतात.
ग्राहकांची अशी फसवणूक होऊ नये, यासाठी बँकेने विनंती केली आहे की, आपल्या स्मार्टफोनवर बँकेची कसलेही तपशील सेव करू नयेत. बँक खात्याचा क्रमांक, पासवर्ड, एटीएम क्रमांक यांचा फोटो काढून ठेवल्यास माहिती लिक होण्याचा धोका असतो. यासोबतच एटीएम पासवर्ड सेव्ह केल्याने खासगी माहिती चोरून खात्याच्यामधून पैसे काढून घेऊ शकता. आपल्या अकाउंट मधून येणाऱ्या ओटीपी म्हणजे वन टाइम पासवर्ड, पिन क्रमांक, डेबिट कार्डचा क्रमांक, सीबीवी क्रमांक ही अत्यंत महत्त्वाची माहिती असून ती कोणालाही सांगता कामा नये. बहुतेक वेळा बँकेची फसवणूक ही याच माध्यमातून होत असते.
आपल्याला कार्ड ब्लॉक करण्याची भीती दाखवून आणि पासवर्ड बदलण्यासाठी आपल्याकडून ओटीपी आणि कार्डच्या मागील सीव्हीव्ही कोड काढून घेतला जातो. व त्यानंतर आपली फसवणूक होते. आपले एटीएम कार्ड आपणच वापरा, इतरांची मदत यासाठी घेऊ नका. पब्लिक ओपन नेटवर्क आणि मोफत वाय फाय यांना जोडून ऑनलाइन व्यवहार करू नका. यामध्ये फसले जाण्याचा मोठा धोका आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group