हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने ग्राहकांसाठी सोमवारी आपल्या YONO प्लॅटफॉर्मवर रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट लाँच केले आहे. याद्वारे आता पात्र असलेल्या ग्राहकांना सुमारे 35 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन मिळवता येणार आहे. याविषयी आणखी माहिती देताना बँकेने सांगितले की, पगारदार ग्राहकांसाठी पर्सनल लोन प्रोडक्ट एक्सप्रेस क्रेडिट आता डिजिटल स्वरूपात आले आहे. ज्याचा लाभ ग्राहकांना आता YONO द्वारे घेता येईल.
बँकेने पुढे सांगितले की,” ते 100% पेपरलेस आणि डिजिटल आहे. या रिअल टाईम एक्सप्रेस क्रेडिट अंतर्गत, आता केंद्र, राज्य सरकार तसेच डिफेंसच्या पगारदार ग्राहकांना पर्सनल लोन घेण्यासाठी SBI च्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाण्याची गरज नाही. यासाठी आवश्यक असलेली पात्रता, मंजुरी, क्रेडिट चेक आणि डॉक्यूमेंटेशन आता रिअल टाइममध्ये डिजिटल पद्धतीने केल्या जातील.
SBI ने या महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्या बल्क टर्म डिपॉझिट्सवरील व्याजदरात (रु. 2 कोटी आणि त्याहून अधिक) 40 ते 90 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. हे नवीन दर आजपासून (10 मे 2022) पासून लागू झाले आहेत. आपल्या अधिकृत वेबसाइटवर माहिती देताना बँकेने सांगितले की, हे सुधारित व्याज दर ताज्या डिपॉझिट्सवर आणि मुदतपूर्ती झालेल्या डिपॉझिट्सच्या रिन्यूअलवर लागू होतील. यासोबतच एनआरओ फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याज दर हे देशांतर्गत फिक्स्ड डिपॉझिट्सप्रमाणेच असतील. दिली आहे.
SBI च्या वेबसाइटनुसार, 5 ते 10 वर्षे आणि 3-5 वर्षांच्या 2 कोटी किंवा त्याहून जास्तीच्या कालावधीसाठी आता 4.50 टक्के व्याज मिळेल. यापूर्वी 3.60 टक्के व्याजदर होता. त्यात 90 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. तसेच SBI 46 ते 179 दिवस आणि 180 ते 210 दिवसांच्या मोठ्या प्रमाणात FD वर 3.5 टक्के व्याज देईल. त्याच वेळी, 211 दिवसांपेक्षा जास्त, 1 वर्षापेक्षा कमी आणि 1 वर्षापेक्षा जास्त, 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 3.75 टक्के आणि 4 टक्के व्याज मिळेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/loans/personal-loans
हे पण वाचा :
Edible Oil Prices : खुशखबर !!! खाद्यतेलाच्या दरात घसरण, जाणून घ्या यामागील कारणे
Gold Price : सोने चकाकले तर चांदीची चमक ओसरली, आजचे नवीन दर पहा
BSNL ग्राहकांसाठी आंनदाची बातमी !!! आता ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार डेली 2GB डेटा
Maruti Vitara Brezza : Tata-Hyundai ला टक्कर देण्यासाठी मारुती घेऊन येणार नवीन SUV
New Hero Splendor+ Launch : देशात सर्वाधिक विकली जाणारी ‘ही’ मोटरसायकल नव्या रूपात लॉन्च