SBI ने 40 कोटी ग्राहकांना दिली आहे मोठी सुविधा, आता घरबसल्या अपडेट करा नॉमिनी व्यक्तीचे डिटेल्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI (State Bank of India) ने देशातील कोट्यावधी ग्राहकांना मोठी सुविधा दिली आहे. आतापासून आपण घरबसल्या आपल्या खात्यात सहजपणे नॉमिनी व्यक्तीचे नाव जोडू शकाल. बँकेने ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. एसबीआयने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. आपण खात्यात नॉमिनी व्यक्तीचे नाव कसे समाविष्ट करू शकता ते जाणून घेउयात.

आपण तीन मार्गांनी नॉमिनी जोडू शकता-
>> बँकेच्या शाखेत जाऊन
>> एसबीआय नेट बँकिंगद्वारे
>> एसबीआय मोबाइल बँकिंगद्वारे

बँकेने केले ट्विट
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की,”आमच्याकडे एक चांगली बातमी आहे! आता नॉमिनी चे नाव जोडण्यासाठी एसबीआय ग्राहक आमच्या शाखेत किंवा वेबसाइट http://onlinesbi.com वर भेट देऊन लॉग इन करू शकतील”

अशाप्रकारे अ‍ॅपद्वारे नॉमिनीचे नाव अपडेट करा-
>> सर्व प्रथम YONO LITE SBI अ‍ॅपवर लॉग इन करा.
>> होम बटणावर क्लिक करून सर्व्हिस रिक्वेस्ट ऑप्शनवर क्लिक करा.
>> सर्व्हिस रिक्वेस्टवर क्लिक केल्यावर ऑनलाईन नॉमिनेशनचा पर्याय पेजवर देण्यात आला आहे जो उघडेल.
>> अकाउंट डिटेल सिलेक्ट करण्यासाठी क्लिक करा आणि नॉमिनीची संपूर्ण माहिती अपडेट करा.
>> आपणास नॉमिनीसह रिलेशनशिपची माहितीही भरावी लागेल.
>> आधीच नॉमिनी व्यक्ती असेल आणि ते अपडेट करायांचे असतील तर पहिले कॅन्सल नॉमिनेशनद्वारे सध्याचे नॉमिनेशन कॅन्सल करावे लागेल, त्यानंतर नव्या नॉमिनी व्यक्तीची संपूर्ण माहिती भरावी लागेल.

SBI nominee

आपण या प्रकारे देखील नॉमिनी व्यक्तीचे नाव अपडेट करू शकता
याशिवाय तुम्ही onlinesbi.com वर भेट देऊन नॉमिनी व्यक्तीचे नाव अपडेट करू शकता. या वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट अँड इन्क्वायरी वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्याला 4 पर्याय दिसतील, त्यापैकी आपल्याला ऑनलाइन नॉमिनेशनवर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला नॉमिनीशी संबंधित सर्व माहिती भरावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी मिळेल. ओटीपी व्हेरिफिकेशननंतर, आपले नॉमिनी नाव अपडेट केले जाईल.

नॉमिनेशन करणे महत्वाचे का आहे?
खातेधारकाला काही झाले किंवा त्याचा मृत्यू झाल्यास अशा परिस्थितीत खातेधारकाच्या नॉमिनीला तुमच्या खात्यात जमा झालेल्या रकमेवर पूर्ण हक्क असेल. जर खात्यात नॉमिनी नसेल तर तुमचे पैसे बँकेचे होतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment