हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI कडून रेपो दरात नुकतेच वाढ करण्यात आली आहे. या दर वाढीनंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदर वाढवले आहेत. याबरोबरच काही बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजातही वाढ केली आहे. अशातच आता स्टेट बँक ऑफ इंडिया कडूनही फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली जाऊ शकेल. बुधवारी RBI कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली. यानंतर रेपो दर वाढून 4.90 टक्के झाला.
SBI चे अध्यक्ष असलेले दिनेश कुमार खारा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आता बँकेकडून पुन्हा एकदा फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याज दरात वाढ केली जाणार आहे. खारा पुढे म्हणाले की,” बँकेने आधीच FD वरील व्याज वाढवले आहेत. आता RBI कडून रेपो दरात वाढ झाल्यानंतर त्यात आणखी एक वाढ होऊ शकेल.”
गेल्याच महिन्यात SBI ने 2 कोटी रुपये किंवा त्याहून अधिकच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली होती. SBI च्या वेबसाइटनुसार, 3 ते 5 आणि 5 ते 10 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील 2 कोटी किंवा त्याहून अधिक कालावधीच्या व्याजदरात 90 बेसिस पॉईंट्सनी वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता फिक्स्ड डिपॉझिट्सवर वार्षिक 4.50 टक्के दराने व्याज मिळेदिले जाईल.
सध्या, SBI मध्ये 12 महिने ते 24 महिन्यांच्या कालावधीसाठी ग्राहकांना FD वर 5.10 टक्के व्याज दिले जाते. त्याच वेळी, जर तुम्ही तीन ते पाच वर्षांच्या FD वरील व्याज दर 5.45 टक्के राहील.
RBI कडून रेपो दरात वाढ झाल्यानंतर बँकांनीही आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे ग्राहकांच्या कर्जाचा EMI देखील महागणार आहे. रेपो दरात वाढ झाल्यामुळे कर्ज देखील महाग होते, कारण बँकाही आपला MCLR दर वाढवतात. हे लक्षात घ्या कि, जेव्हा MCLR वाढतो तेव्हा कर्ज महागते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/deposit-rates
हे पण वाचा :
HDFC कडून व्याजदरात वाढ !!! आता होम लोन महागणार, नवे दर पहा
PM Kisan : आता फक्त ‘ही’ अट पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच दिला जाणार 12 वा हप्ता
Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट !!!
Gold Price Today : सोन्या- चांदीमध्ये आज घसरण !!! नवीन दर पहा
Kotak Mahindra Bank ने आपल्या बचत खाते आणि FD वरील व्याजदरात केली वाढ !!!