हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI ने 8 फेब्रुवारी रोजी रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. ज्यानंतर बँकांनी आपले मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR वाढवण्यास सुरुवात केली आहे. आता SBI ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.कारण SBI ने सर्व कालावधीच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR मध्ये 10 पॉईंट्सनी वाढ केली आहे. आता बँकेकडून कर्ज घेणे महाग होणार आहे. बँकेचे नवीन दर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाले आहेत.
नवीन MCLR रेट खालीलप्रमाणे
SBI ने ओव्हरनाईटचा MCLR रेट 7.95% केला आहे. त्याचप्रमाणे, 1 महिन्यासाठी 8.10% आणि 3 महिन्यांसाठी MCLR रेट 8.10% केला आहे. त्याच वेळी, बँकेने 6 महिन्यांसाठीचा MCLR रेट 10 बेसिस पॉईंट्सनी वाढकन 8.40 टक्के, 1 वर्षासाठीचा MCLR रेट 8.40 टक्क्यांवरून 8.50 टक्के, 2 वर्षांसाठीचा MCLR रेट 8.50 टक्क्यांवरून 8.60 टक्के तसेच 3 वर्षांसाठीचा MCLR रेट 8.60 टक्क्यांवरून 8.70 टक्के झाला आहे केला आहे.
जास्त EMI द्यावा लागणार
MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील. SBI
रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ
8 फेब्रुवारी रोजी RBI सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर माहिती देताना गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
MCLR काय असते ???
MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. SBI
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/mclr
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे