हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI MODS : गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये FD चा देखील समावेश होतो. आजही अनेक लोकांकडून गुंतवणुकीसाठी FD ची निवड केली जाते. अनेकदा ग्राहकांकडून आर्थिक संकटांच्या काळात मुदतीआधीच FD खंडित केली जाते. मात्र त्यासाठी दंड म्हणून बँकेला काही रक्कम द्यावी लागते. सामान्य FD मध्ये, मुदती आधीच काढलेल्या व्याजाच्या रकमेवर सामान्यतः 1 टक्के दंड लागू होतो. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून अशा एका FD ची ऑफर दिली जाती ज्यामध्ये कधीही पैसे काढता येतील. तसेच त्यासाठी कोणता दंड देखील द्यावा लागणार नाही.
एसबीआयच्या या एफडी खात्याचे नाव मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीम किंवा SBI MODS असे आहे. ही एक टर्म डिपॉझिट स्कीम आहे जी ग्राहकाच्या बचत किंवा चालू खात्याशी जोडलेली असते. हे लक्षात घ्या कि, यामध्ये सामान्य टर्म डिपॉझिटप्रमाणे, ग्राहकाला एसबीआय मोड्स खात्यातून मुदतीआधी पैसे काढण्यासाठी कोणताही दंड भरावा लागत नाही.
या खात्यासाठीची पात्रता काय आहे ???
सिंगल किंवा जॉईंट, अल्पवयीन नावाने पालक, संयुक्त हिंदू कुटुंबातील कर्ता, फर्म, कंपनी, स्थानिक संस्था आणि कोणतेही सरकारी विभागाला आपल्या स्वत: च्या नावाने SBI मोड्स अकाउंट उघडू शकतात. SBI MODS
यासाठीचा व्याज दर काय असेल ???
SBI MODS स्कीममध्ये, ग्राहकाला नियमित टर्म डिपॉझिटवर भरलेल्या व्याजाइतकेच व्याज मिळते. उदाहरणार्थ, SBI च्या नियमित FD वर 5.5 टक्के व्याज उपलब्ध असल्यास, SBI मोड्समध्ये फक्त 5.5 टक्के व्याज मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के व्याज मिळेल.
SBI MODS योजनेचा कालावधी
SBI MODS योजनेचा कालावधी 1 ते 5 वर्षे आहे. एसबीआयच्या मते, मोड्स खात्यातून 1000 रुपयांच्या पटीत पैसे काढता येतात. तसेच यामध्ये पैसे काढण्याच्या मर्यादेवर कोणतेही बंधन नाही. याबरोबरच एटीएम, चेक किंवा बँकेच्या शाखेत जाऊन ग्राहक या खात्यातून पैसे काढू शकतात.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/investments-deposits/deposits/mod
हे पण वाचा :
गेल्या काही वर्षांत ‘या’ 2 Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना बनवले कोट्यधीश !!!
SBI मध्ये 5000 हुन अधिक जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचा भाव पहा
Apple iPhone 14 : iPhone 14 सीरीजची धमाकेदार एंट्री; शानदार फीचर्ससह कंपनीने लॉन्च केले 4 मोबाईल्स