हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI ने नुकतेच रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यानंतर, SBI ने आपल्या डिपॉझिट्सच्या दरात वाढ केली आहे. मात्र, बँकेकडून ही वाढ फक्त बल्क टर्म डिपॉझिट्ससाठी केली गेली आहे.
बँकेने बल्क टर्म डिपॉझिट्स (2 कोटी रुपये) आणि त्याहून जास्तीच्या डिपॉझिट्ससाठीचे व्याजदर 40 ते 90 bps (म्हणजे 0.40 टक्क्यांवरून 0.90 टक्के) वाढवले आहे. मंगळवार 10 मे पासून हे नवीन दर लागू झाले आहेत.
3 ते 10 वर्षांच्या डिपॉझिट्सवर सर्वाधिक व्याज वाढले
बँकेच्या वेबसाइटनुसार, 3 ते 10 वर्षे कालावधीसाठीच्या 2 कोटी रुपये किंवा त्याहून जास्त रुपयांच्या डिपॉझिट्सवर आता 4.50 टक्के व्याज मिळेल, यावर आधी 3.60 टक्के व्याज दर दिला जात होता.
त्याच वेळी, 2-3 वर्षांपर्यंतच्या बल्क डिपॉझिट्सचा व्याजदर 3.60 टक्क्यांवरून 4.25 टक्के करण्यात आला आहे. 1-2 वर्षांच्या बल्क डिपॉझिट्सचा व्याजदर देखील 3.60 टक्क्यांवरून 4 टक्के करण्यात आला आहे.
नवीन डिपॉझिट्स आणि रिन्यूअलवर नवीन दर लागू
46-179 दिवस आणि 180-210 दिवसांच्या मुदतीच्या बल्क डिपॉझिट्सवर 3.50 टक्के व्याज मिळेल तर 211 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या डिपॉझिट्सवर 3.75 टक्के व्याज मिळेल.
बँकेने पुढे सांगितले की, NRO टर्म डिपॉझिट्सचे व्याज दर देशांतर्गत टर्म डिपॉझिट्सवर लागू होणाऱ्या दरांच्या आधारे दिले जातील. हे सुधारित दर नवीन डिपॉझिट्स आणि मुदतपूर्ती डिपॉझिट्सच्या रिन्यूअलवर वर लागू होतील.
सिस्टीममधील लिक्विडीटी कमी होत आहे
एका रिपोर्ट्स नुसार, सध्या सिस्टीममधील लिक्विडीटी कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पॉलिसी रेपो दरातील वाढ लक्षात घेऊनच बल्क डिपॉझिट्स दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्याच वेळी, येत्या काही महिन्यांतील संभाव्य आव्हाने लक्षात घेऊन मोठ्या रकमेवरील डिपॉझिट्सचे दर वाढवून त्यास सामोरे जाण्याची तयारी केली जात आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.onlinesbi.com/
हे पण वाचा :
FD वर कोणती बँक देते जास्त व्याज?? पहा संपूर्ण लिस्ट
SBI महिलांसाठी कमी व्याजदरावर देत आहे स्वस्त होमलोन
SBI चा ग्राहकांना झटका! Home Loan, Car Loan झाले ‘इतके’ महाग
Akshaya Tritiya Offer : अक्षय तृतीयेला SBI कार्डद्वारे खरेदी करून मिळवा बंपर कॅशबॅक
SBI चा ग्राहकांना सतर्कतेचा इशारा!! ‘या’ 2 नंबर वरील कॉल उचलू नका, अन्यथा……