कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळला आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदी (curfew) लागू करण्यात आली आहे.15 दिवसांसाठी हि जमावबंदी (curfew) असणार आहे. या काळात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. तसंच मिरवणुका आणि सभांनाही बंदी असणार आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी हे जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. याचबरोबर जर कोणी या आदेशाचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
कोल्हापुरात जमावबंदी का?
सीमाप्रश्नावरुन महाविकास आघाडीच्या कर्नाटक सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी (curfew) आदेश लागू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 9 डिसेंबरपासून 23 डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू असणार आहे.
महाविकास आघाडीचं आंदोलन
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न आणि छत्रपती शिवाजी महाराज अवमानाच्या निषेधार्थ शनिवारी कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळावर आंदोलन करण्याची घोषणा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. याअगोदर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली होतीं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीम, काँग्रेसचे सतेज पाटील, जयश्री जाधव, शिवसेनेचे संजय पवार यांच्यासह मविआचे नेते उपस्थित होते.
हे पण वाचा :
खास फुटबॉलप्रेमींसाठी Jio ने लाँच केला जबरदस्त प्लॅन
दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली, कोट्यवधींचा गंडा घातला; कोणी केला गंभीर आरोप
मजबूत बॅटरी अन् 50MP कॅमेरा असलेला Tecno Pova 4 स्मार्टफोन भारतात लॉन्च
दिल्लीतील विजयानंतर ‘आप’चा ‘रिंकीया के पापा’ या गाण्यावर डान्स करत जल्लोष
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका