हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. राजकीय नेत्यांमध्ये भेटीगाठी, आरोप-प्रत्यारोप अशा घडामोडी घडू लागलेल्या आहेत. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या या भेटीबद्दल विविध राजकीय अर्थ काढले गेले. या भेटीबाबत काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादीचे शरद पवार हेही गुगली टाकण्यात एक्सपर्ट आहेत त्यांनी आशा अनेक गुगल्या टाकलेल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार एकदम भक्कम आहे,” असे शिंदे यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसच्या नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून आगामी निवडणुकीत स्वबळाचा वापर केला जाणार हे निश्चित. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी व शिवसेना यांनीही आपापल्या पद्धतीने स्वबळाची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली. तसेच दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. या भेटीबाबत माजीमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ” मोदी व पवार यांच्या भेटीबाबत कोणीही काळजी करण्याचे काहीच कारण नाही. महाविकास आघाडी सरकार एकदम भक्कम आहे. त्यांना काहीही धक्का लागणार नाही.”
पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याच्या विधानाबाबत शिंदे म्हणाले यांनी म्हंटल आहे की, पटोले जे बोललतात ते सत्य आहे, आम्हाला आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. आम्हीही आमचा पक्ष खंबीर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही त्या ठिकाणी जरी आज एकत्र असलो म्हणून आमचा पक्ष आम्ही तोडमोडीला काढणार नाही. सोबत आहे तोपर्यंत जवळ राहणार पण जेव्हा आमच्या पक्षाची उभारणी करायची आहे, ती आम्ही करतच राहणार.