मुंबई प्रतिनिधी |राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा खचलेला जनाधार सुधारण्यासाठी शरद पवार यांनी सोशल मिडीयाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळी दौऱ्यावर असताना देखील शरद पवार यांच्या फेसबुक पेज वरून LIVE असायचे. भाजपला सोशल मीडियातून मिळणारा प्रतिसाद हा त्यांच्या विजयाला हातभार लावून गेला. येत्या निवडणुकीला आपण देखील या तंत्राचा वापर करून लोकांच्या मनात अधिकाधिक घर करू असा शरद पवारांचा उद्देश आहे.
शरद पवार उद्या रविवारी ९ जून रोजी सकाळी ११ वाजता फेसबुक LIVE च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. १० जून रोजी होणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिना निमित्त या फेसबुक LIVEचे आयोजन केले असण्याची दाठ शक्यता आहे. शरद पवार आपल्या फेसबुक LIVEच्या माध्यमातून दुष्काळी जनतेचे तसेच युवकांचे प्रश्न समजून घेण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस आधी या फेसबुक LIVE चे आयोजन करून शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा ब्रॅण्ड सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान शरद पवार यांच्या फेसबुक LIVE चे आयोजन दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्याच्या प्रश्नाचे निवारण करण्यासाठी करण्यात आले आहे. शेतकऱ्याच्या आणि गरिबांच्या प्रश्नाची निवड या फेसबुक LIVE साठी करण्यात आली आहे ज्या प्रश्नाची उत्तरे शरद पवार देणार आहेत असे राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2EDyi7e
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेने आणि मोहिते पाटलांच्या मदतीने एवरेस्ट वीराचे पार्थिव मायभूमीत
भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? रावसाहेब दानवे म्हणतात…
मोदींच्या मंत्री मंडळात मंत्री म्हणून शपथ घेणारे रावसाहेब दानवे नेमके आहेत कोण ?