हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ईडीकडून होत असलेल्या कारवाईवरून तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केल्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवासस्थानी सर्वपक्षीय खासदारांसह डिनर पार्टी केली. यानंतर आज पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी मोदी यांच्याशी सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा केली. या दोन्ही नेत्यासाच्या भेटीमधील व चर्चेमागील कारण मात्र, गुलदस्त्यात आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने या भेटीत चर्चा झाल्याचे सांगितले जात असून पवारांनी आज अचानक मोदींची भेट घेतल्याने या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.