पवारांनी टोचले राहुल गांधींचे कान; सावरकरांचा मुद्दा काँग्रेस टाळणार? दिल्लीत नेमकं काय घडलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हंटल्यानंतर देशासह राज्यभरात चांगलाच वाद पेटला आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना इशारा दिल्यांनतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राहुल गांधींचे कान टोचले आहेत. सावरकरांना माफीवीर म्हणणंही योग्य नाही. सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुदद्दे आपल्या समोर आहेत. यावर चर्चा व्हावी असं शरद पवार यांनी म्हंटल.

काल रात्री दिल्लीत देशभरातील विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, आम आदमी पक्ष , समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी सावरकर वादावर भाष्य केलं. सावरकर आणि आरएसस यांचा काहीही संबंध नाही. सावरकरांना माफीवीर म्हणणंही योग्य नाही. सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुदद्दे आपल्या समोर आहेत. यावर चर्चा व्हावी असं शरद पवार यांनी म्हंटल. शरद पवारांच्या या विधानाचे अन्य खासदारांनीही समर्थन केलं. तसेच राहुल गांधी यांनीही पवारांच्या मताचा मी आदर करतो असं बैठकीत म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस आता सावरकरांचा मुद्दा टाळणार का अशा चर्चा सुरु आहेत.

दरम्यान, या बैठकीला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाने बहिष्कार टाकला होता. खासदार संजय राऊत हे स्वतः दिल्लीत होते परंतु तरीही त्यांनी या बैठकीला पाठ फिरवली. आज आपण राहुल गांधी याना भेटणार आहोत त्यावेळी सावरकरांबाबत चर्चा होईल असं संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच या मुद्यावरून महाविकास आघाडीत कोणतीही फूट पडणार नाही. महाविकास आघाडी एकत्रच असेल असेही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.