ठाकरेंचं भाषण व चिन्हाच्या निर्णयावर शरद पवारांनी दिली दोनच शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. आयोगाच्या निर्णयानंतर काल उद्धव ठाकरे यांनी कलानगर चौकात बाळासाहेब ठाकरे स्टाईल ओपन जीपवरून भाषण केलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोनच शब्दात प्रतिक्रिया दिली. “मी या वादात पडणार नाही, मी परवाच माझी भूमिका स्पष्ट केली आहे, असे पवार यांनी म्हटले.

शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले की, चिन्ह गेले म्हणून काहीही फरक पडणार नाही. निकाल लागल्यावर त्यावर काही चर्चा करता येत नाही. त्याला स्वीकारायचं आणि नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा फार परिणाम होत नसतो.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावर म्हणाले कि, सहकार परिषदेच्या समारंभासाठी शाह पुण्यात आले होते. सहकार परिषदेचं उद्घाटन माझ्या हस्ते पार पडलं. त्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. धोरणात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे योग्य वाटले.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी काल कलानगर चौकात बाळासाहेब ठाकरे स्टाईल ओपन जीपवरून भाषण केलं. यावेळी ते म्हणाले, शिवसेना संपवण्याचा डाव सुरु आहे, पण शिवसेना संपणार नाही. आपण पुन्हा एकजुटीने लढू. मी खचलो नाही आणि खचणार सुद्धा नाही. रावणाने सुद्धा शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता आणि तोच उताणा पडला त्याचप्रामणे या चोरांनाही धनुष्यबाण पेलता येणार नाही अशी टीका ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केली.