पत्राचाळ प्रकरणातील आरोपांवर पवारांचे प्रत्युत्तर; भाजपला दिले खुलं आव्हान

sharad pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच असून याबाबत त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आल्यांनतर पवारांनी देखील आता या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. जी चौकशी करायची ती करा पण जर माझ्यावरील आरोप खोटे निघाले तर आरोप करणाऱ्यावर काय कारवाई करणार हे सुद्धा राज्य सरकारने जाहीर करावे, असे प्रति आव्हान शरद पवारांनी दिले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज शरद पवार यांच्या उपस्थितीत आज पत्रकार परिषद झाली. जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. यावेळी पत्राचाळ प्रकरणी पवारांवर होत असलेल्या आरोपांवर राष्ट्रवादीने पलटवार केला. पत्राचाळ प्रकरणी पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. मात्र या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही, तर सरकार याबाबत निर्णय घेईल असे मत शरद पवारांनी तेव्हा मांडले असे यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

https://www.facebook.com/PawarSpeaks/videos/504875980969222/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C

बैठक घेणं हे शरद पवार यांच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. आजपर्यंत राज्यातील विविध प्रश्नावर शरद पवारांनी अनेक बैठका घेतल्या आहेत . चर्चा करुन संवाद साधणे आणि मध्य मार्ग काढणे हाच हेतू बैठकीत असतो असं म्हणत भाजपने उगीच पराचा कावळा करू नये असे जितेंद्र आव्हाडांनी म्हंटल. भाजपला जर याप्रकरणी चौकशी करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण जर आरोप खोटे निघाले तर आरोप करणाऱ्यावर काय कारवाई करणार हे सुद्धा जाहीर करा असं आव्हान आव्हाडांनी भाजपला दिले.