हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुरुवारी बारामतीतील पत्रकारांशी बोलताना, ‘अजित पवार हे आमचेच नेते आहेत त्यात काही वादच नाही’, असे स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केले होते. मात्र आता साताऱ्यात बोलताना, शरद पवार यांनी त्यांनी केलेल्या या वक्तव्याला नकार दिला आहे. “मी तसं काही बोललोच नाही” असं शरद पवार यांनी म्हटल आहे. यामुळे पुन्हा राष्ट्रवादी नेमके काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर शरद पवार यांनी आपले शब्द बसल्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.
आज साताऱ्यात शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, “पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळी आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी मागायची नसते आणि मागीतली तर ती द्यायची नसते. सध्या आमची भूमिका दुसरी आहे. आमचे नेते असं मी म्हणालो नाही. सुप्रिया अजित पवारांना नेते म्हणाली. सुप्रिया त्यांची धाकटी बहिण आहे. त्याच्यामुळे बहिण भावांच्या नात्यात बोललेल्या गोष्टीचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. आज जी भूमिका आमच्या सहकाऱ्यांनी घेतली ते आमचे नेते नाहीत” असं शरद पवार यांनी म्हणले आहे.
शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तर, शरद पवारांच्या या वक्तव्याचा अर्थ काय याबाबत देखील संभ्रमण निर्माण झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी बारामतीत असताना सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी, “अजित पवार हे आमचेच आहेत. सध्या ते फक्त सत्ताधारी पक्षात आणि आम्ही विरोधी पक्षात आहोत” असे म्हटले होते. यानंतर सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य कितपत योग्य आहे असे शरद पवार यांना विचारण्यात आले होते. तेव्हा त्यावेळी, “राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, अजित पवार हे आमचेच नेते आहेत” असं शरद पवारांनी सांगितले होते.
त्याचबरोबर, “फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी होते, जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, आज तशी स्थिती येथे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला, वेगळी भूमिका घेतली लोकशाहीमध्ये तोत्यांचा अधिकार आहे. वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणण्याचं काही कारण नाही हा त्यांचा निर्णय आहे” असे देखील शरद पवार यांनी म्हणले होते. मात्र आता आपण कोणतेही असे वक्तव्य केले नाही अशा शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.