हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करावे असा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मांडला गेल्याने राजकीय चर्चाना उधाण आले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी या भूमीकेचे समर्थन केले. शरद पवार यांनी यूपीएचे अध्यक्ष व्हावे असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.
शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. आज जर विरोधकांची एकजूट करायची असेल , बिगर भाजपशासित मुख्यमंत्री अन् भाजप विरोधकांना एकत्र आणायचं असेल तर नक्कीच शरद पवार हे काम करू शकतात याबाबत सर्वांच्या मनात खात्री आहे. आम्ही तर ही भूमिका यापूर्वीच मांडली आहेअसे संजय राऊत यांनी म्हंटल.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा ठराव-
देशातील सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता शरद पवार यांनी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायला हवं. शरद पवार हे देशातील सध्याचे सर्वात अनुभवी नेते आहेत. संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे देशाच्या विकासातील योगदान मोठे आहे. या सर्व बाबी विचारात घेत त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व सोपवायला हवे’, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या ठरावात नमूद करण्यात आले आहे.