शरद पवारांची घरावरील हल्ल्यानंतर पहिली प्रतिक्रिया; घराबाहेर आल्यानंतर म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवास स्थानी आज शुक्रवार दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक मोर्चा काढला. कर्मचाऱ्यांनी पवारांच्या विरोधात फक्त घोषणाबाजी दिली नाही तर चप्पल आणि दगड देखील फेकल्या. या घटनेनंतर महाविकास आघाडीमधील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता थेट शरद पवारांनी या घटनेवर मत व्यक्त केले आहे.

आज दुपारी झालेल्या घटनेवर मला काही वेगळ मत व्यक्त करण्याची गरज नाही वाटत. सिलव्हर ओकवर जे काही घडले, त्याबाबत आश्चर्य देखील व्यक्त करण्याची गरज नाही. हे म्हणजे नेता शहाणा नसला तर त्याचे वाईट परिणाम कार्यकर्त्यांवर देखील होतात याचे हे उदाहरण होय. राज्यातील राजकारणात मतभेद आणि संघर्ष असतात, मात्र टोकाची भूमिका घेण्याची आपली परंपरा नाही, असे शरद पवार म्हणाले.

सिल्वर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चावर शरद पवार पहिल्यांदाच बोलले. एसटी कर्मचाऱ्यांची उपासमार होत असल्याच ते म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्त्व चुकीचे आहे, असंही पवारांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा ही भूमिका असल्याचं पवार म्हणाले. गेल्या ४० ते ५० वर्षात एसटीचे एकही आधिवेशन माझ्याकडून चुकले नाही. एसटीचे कर्मचारी आणि राष्ट्रवादीचे घनिष्ठ संबंध आहेत. जेव्हा जेव्हा काही प्रश्न निर्माण झाले तेव्हा तेव्हा ते सोडवण्यासाठी माझ्याकडून आणि माझ्या सहकाऱ्यांकडून कष्ट घेतले गेले. यावेळी मात्र त्यांना चुकीचा मार्ग दाखवला गेला आणि त्याचे परिणाम आज दिसत आहेत असे पवार यांनी म्हटले आहे.