Share Market Holiday : साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त ऑक्टोबरमध्ये इतके दिवस शेअर बाजार राहणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market Holiday : ऑक्टोबरमध्ये 3 मोठे सण येत असून, यादिवशी शेअर बाजार बंद राहणार आहेत. यातील पहिली सुट्टी 5 ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त असेल. यानंतर 24 ऑक्टोबरला दिवाळी आणि 26 ऑक्टोबरला दिवाळी प्रतिपदानिमित्त बाजार बंद राहणार आहे. मात्र, दिवाळीला मुहूच्या मुहूर्त ट्रेडिंगसाठी बाजार सुरु असेल, त्याची नेमकी वेळ बाजाराकडून त्याच तारखेच्या आसपास कळवली जाईल.

या तीन दिवसांसाठी बाजारातील इंटरेस्ट डेरिव्हेटिव्ह आणि करन्सी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट देखील बंद राहतील. BSE च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि एसएलबी सेगमेंटमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही. Share Market Holiday

Share market holiday on Holi 2022 stock market Sensex Nifty close - Business News

MCX ला अर्धा दिवस सुट्टी असेल

हे लक्षात ठेवा कि, 5 आणि 26 रोजी संध्याकाळी 5 नंतर मल्टी कमोडिटीमध्ये ट्रेडिंग सुरू होईल. मात्र 24 तारखेला म्हणजेच दिवाळीला दिवसभर ट्रेडिंग बंद राहणार आहे. त्याच वेळी, नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज लिमिटेड (NCDEX) वर 5 आणि 26 ऑक्टोबर रोजी ट्रेडिंग पूर्णपणे बंद असेल. तसेच दिवाळीच्या दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला दुसऱ्या शिफ्टमध्ये ट्रेडिंग सुरु होईल. Share Market Holiday

Indian Stock Market Holiday Calendar for 2022 - Online Demat, Trading, and Mutual Fund Investment in India - Fisdom

शेअर बाजाराला आणखी किती सुट्ट्या असतील ???

या महिन्यातील 3 सुट्ट्यानंतर आता बाजाराला आणखी एक दिवस सुट्टी मिळणार आहे. पुढील महिन्यात 8 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त बाजार बंद राहणार आहेत. या सुट्ट्या प्रत्येक आठवड्याच्या साप्ताहिक सुट्ट्यांपेक्षा वेगळ्या आहेत. हे लक्षात घ्या कि, साप्ताहिक सुट्टी व्यतिरिक्त या वर्षी एकूण 9 वेळा बाजार बंद होता. 2022 मध्ये शेअर बाजाराला एकूण 13 सुट्ट्या मिळाल्या आहेत. Share Market Holiday

Monday Mayhem: Stock Market Crashes, Rupee Plunges To An All-Time Low Of Rs 78 Per Dollar - Business

बाजारातील घसरण सुरूच

शेअर बाजारातील घसरण काही थांबेना झाली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स 1000 हून जास्त अंकांच्या वाढीने बंद झाला. मात्र ऑक्टोबर सुरु होताच बाजाराने पुन्हा एकदा घसरणीची वाट धरली. सोमवारी सेन्सेक्स 638.11 अंकांनी (1.11 टक्क्यांनी) घसरून 56,788 वर तर निफ्टी 207 अंकांनी (1.21 टक्के) घसरून 16887 च्या पातळीवर बंद झाला. गेल्या आठवड्यातही शुक्रवार वगळता बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली. गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी 7 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 1.16 लाख कोटी रुपयांची घट झाली होती. अमेरिका, युरोप आणि इतर आशियाई बाजारपेठांमध्येही हाच ट्रेंड पाहायला मिळतो आहे. Share Market Holiday

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/static/markets/marketinfo/listholi.aspx

हे पण वाचा :

e-PAN Card डाउनलोड करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

SOVA Trojan : सावधान !!! जर आपल्या फोनमध्ये आला असेल ‘हा’ व्हायरस तर …

Stock Tips : घसरत्या बाजारातही ‘या’ 5 कंपन्यांचे शेअर्स देऊ शकतात मजबूत नफा, त्याविषयी तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

Bank FD : ‘या’ बँकेने लाँच केली स्पेशल FD स्कीम !!! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 8.40 % व्याज

DCB Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ, नवीन दर तपासा