हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटातील दसरा मेळाव्यावरून चर्चा सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीजर रिलीज केला होता. त्यानंतर शिवसेनेकडूनही बाळासाहेब ठाकरेंचा एकही आमदार फुटला तर त्याला रस्त्यात तुडवा असं विधान केलेला व्हिडिओ शेअर केला होता. आता पुन्हा एकदा शिंदे गटाकडून ठाकरेंना प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंचाच व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादी बाबत केलेल्या जुन्या भाषणाचा दाखला देण्यात आला आहे.
विसर न व्हावा….दसरा मेळावा बी.के.सी. मुंबई pic.twitter.com/w11LyGoh7d
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) October 1, 2022
शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी एक विडिओ शेअर केला आहे. आपली ताकद मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागे कदापि उभी राहून देणार नाही असं उद्धव ठाकरे या व्हिडिओ म्हणताना दिसत आहेत. तसेच निवडणुकीनंतर भाजपसोबत भगव्यासाठी, हिंदुत्त्वाची युती करण्यापेक्षा आधीच युती करून आपलं सरकार का आणायचं नाही जे आपण याआधी आणलं .. असेही ते म्हणलेले दिसत . याशिवाय विसर न व्हावा असं म्हणत उद्धव ठाकरेंना भाजपने टोलाही लगावला आहे. निष्ठा विचारांशी.. लाचारांशी नाही असं ब्रीदवाक्य दिसत आहे. व्हिडिओच्या अखेरीस बाळासाहेब ठाकरे यांचा आवाजही ऐकू येत आहे.
कालचे कर्मदरिद्री…आज जिवलग???@OfficeofUT @abpmajhatv @ShivSena @INCMaharashtra #विसर_न_व्हावा #शिवसेना#EknathShinde pic.twitter.com/9YQy1zt42I
— Naresh Mhaske (@nareshmhaske) October 1, 2022
त्यानंतर शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंचा अजून एक विडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, ३७० कलम हटवणाऱ्या भाजपला पाठिंबा द्यायचा नाही तर काय कर्मदरिद्य्रा काँग्रेसला पाठिंबा द्यायचा का ? असं उद्धव ठाकरे बोलताना दिसत आहेत. यावेळी नरेश म्हस्के यांनी ट्विट करत कालचे कर्मदरिद्री…आज जिवलग??? असा सवाल करत उद्धव ठाकरेंना डिवचले आहे.