दूध टँकरने पती-पत्नीला चिरडलं! घटना CCTV मध्ये कैद

accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – अहमदनगर-मनमाड महामार्गावर बाभळेश्वर चौकात एक भीषण अपघात (accident) घडला आहे. यामध्ये दुचाकीवरुन जात असलेल्या दाम्पत्याला एका दूध टँकरने चिरडले आहे. हि संपूर्ण अपघाताची (accident) घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या भीषण अपघातात पतीचा मृत्यू झाला तर पत्नीची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

भरदिवसा झालेल्या या दुर्दैवी घटनेनंतर चौकात एकच खळबळ उडाली होती. हा अपघात (accident) इतकं भयंकर होता की दोघाही पतीपत्नीच्या अंगावर दुधाच्या टँकरचं डावं चाक गेले आणि ते दोघे टँकरखाली चिरडले गेले. यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्या उपचार सुरु आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आणि बाभळेश्वर चौकातील अर्धवट कामामुळे हा दुर्दैवी अपघात घडला.

या दुर्दैवी अपघातामध्ये (accident) पिंप्री निर्मळ येथील 54 वर्षीय उत्तम पाखरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नीवर प्रवरा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :
Flipkart वर 21,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone 11
दुधारू जनावरांचा विमा काढल्यास मिळणार 88 हजार रुपये नुकसान भरपाई, जाणून घ्या किती असणार प्रिमिअम
कठोर परिश्रम करू, पुन्हा लढू; गुजरात निकालावर राहुल गांधींचे Tweet
केवळ 10 रुपयांमध्ये करा आता 150 किलोमीटरचा प्रवास, आझमगडच्या तरुणाचा अप्रतिम शोध
भाजपच्या विजयानंतर मोदींचे Tweet; नेमकं काय म्हणाले?