हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे vs शिंदे सत्तासंघर्षांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना नेमकी कोणाची याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालय देईल. तत्पूर्वीच जिथं ठाकरे तिथं शिवसेना, आम्ही गट वगैरे मानत नाही असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला फटकारलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, शिवसेना विरुद्ध शिंदे गट अशी ही लढाई आहे. जरी या सर्वांसंदर्भात एका विशिष्ट बाजूने निर्णय घेण्याचे कोणावर दबाव असेल तरी सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राची पुण्याई वाया जाणार नाही. राज्यातील जनता डोळ्यात प्राण आणून या निर्णयाकडे पाहत आहे असं संजय राऊत म्हणाले. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेचं आहे. बाकी जे गट वगैरे आहेत यांच्यासंदर्भात निकाल राज्यातील जनता घेईल आणि न्यायालयसुद्धा घेईल. बाळासाहेब आणि महाराष्ट्राचं पुण्य अशाप्रकारे कोणाला पळवून नेता येणार नाही असेही राऊतांनी ठणकावले.
Happy Birthday Sharad Pawar : पवारांनी तेव्हा पोलिसांचा मार खाल्ला, पण बेळगाव गाठलेच
पहा वेषांतराचा 'तो' किस्सा
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/kJLoed8OqS#Hellomaharashtra @PawarSpeaks @NCPspeaks
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 12, 2022
दरम्यान, कल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पार पडले. मात्र या कार्यक्रमावेळी लावलेल्या कट आऊट मध्ये बाळासाहेब ठाकरेंचे कटआऊट सर्वात शेवटी लावले होते, त्यांच्यापूर्वी मोदी, फडणवीस आणि शिंदेंचं कटआऊट लावले होते, यावरूनही राऊतांनी भाजप आणि शिंदेंवर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेताना शिंदे भावुक झाले हे ढोंग आहे हे यावरून सिद्ध होत. मोदींनीही बाळासाहेबांचा उल्लेख केला, पण तेथे कुठेही बाळासाहेबांचा सन्मान राहील, प्रतिष्ठा राहील असं वर्तन कोणी केलं नाही असं म्हणत संजय राऊतांनी टीका केली.